सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक 27 मध्ये आज वुई लव्ह यू फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमा चे अध्यक्ष, सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी माननीय विठ्ठल ढेपे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून फौजदार चावडीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ दिघे हे होते. यावेळी वुई लव्ह यू फाउंडेशनचे सोलापूर शाखेचे अध्यक्ष विजय पाटोळे यांनी आपल्या मनोगतातून मनपाच्या सर्व शाळांना योगदान देण्याचे सांगितले. यावेळी सुपरवायझर श्री. कासार साहेब कार्यक्रमासाठी उपस्थित होते फाउंडेशन च्या वतीने सर्व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला महानगरपालिका शाळा क्रमांक 27 च्या मैदानावर घेण्यात आला सदर कार्यक्रमासाठी कॅम्प परिसरातील मुले कॅम्प, मुली कॅम्प, सेमी इंग्लिश विडी घरकुल,शाळा नं. 26,30,29,05 शाळेचे शिक्षक विद्यार्थी सर्वजण मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थीत होते. माननीय प्रशासनाधिकारी ढेपे साहेब यांनी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर फौजदार चवडीचे निरीक्षक माननीय विश्वनाथ दिघे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.बाळासाहेब जगताप सर यांनी केले व आभार श्री. दत्तात्रय चौगुले यांनी मानले व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना नवले,शीतल पवार , शुभांगी चौगुले , शेख, इंगोले श्रीमती सिद्धवाडकर आदींनी प्रयत्न केले.