सोलापूर : विद्युत वितरण कंपनीकडून मंद्रुप सबस्टेशन येथील दुरुस्ती कामासाठी १० मे रोजी दुपारी 2 तास शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे टाकळी हेड वर्क्स येथून होणारा पाणी उपसा पुरेशा प्रमाणात होणार नसल्याने सोरेगाव जलशुध्दिकरण केंद्रावरुन होणारा दि.१० मे २०२३ रोजीचा नियोजित पाणी पुरवठा उशीरा, कमी वेळ व कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे कार्यकारी अभियंता तथा सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड यांनी केले आहे. टाकळी हेड वर्क्स येथून होणारा पाणी उपसा दि. १० मे २०२३ रोजी पुरेशा प्रमाणात होणार नसल्याने सोरेगाव जलशुध्दिकरण केंद्रावरुन होणारा दि.१० मे २०२३ रोजीचा नियोजीत पाणी पुरवठा उशीरा, कमी वेळ व कमी दाबाने होणार आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, सोलापूर विभागाकडून १३२ के.व्ही / ३३ के.व्ही मंद्रुप सबस्टेशनहून टाकळी हेड वर्क्सला ३३ के.व्ही उच्च दाबाने विद्युत पुरवठा केला जातो. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विनंती नुसार मंद्रुप सबस्टेशन विभागाकडून मंद्रुप सबस्टेशन येथील दुरुस्ती कामासाठी दि.१० मे २०२३ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत शटडाऊन घेणेत येणार आहे.