सोलापूर – वारकरी संप्रदाय समाजातील तळापर्यंत पोहोचण्यासाठी युवाशक्तीची अत्यंत गरज आहे. युवाशक्ती संघटित करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळ काम करत आहे. असे अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह भ प सुधाकर महाराज इंगळे युवा वारकरी मेळावा प्रसंगी बोलत होते..
तरुणांमध्ये वारकरी विचार रुजण्यासाठी तरुणाई व्यसनमुक्त करण्यासाठी तरुणांची गुणवत्ता व संख्यात्मक वाढ करण्यासाठी ऐतिहासिक वारसा सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाकडून युवक वारकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता..
या मेळाव्यास सोलापुरातील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रमुख ज्ञानेश्वर कोटा, संत तुकाराम महाराज पालखी प्रमुख दर्शन ढगे, माऊली लँडमार्कचे प्रमुख माऊली झांबरे, शिवराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू वाडेकर, संभाजी आरमारचे प्रमुख श्रीकांत डांगे, प्रीतम परदेशी, राम कबाडे आदी मान्यवर उपस्थित होते..
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आली..
यावेळी युवा समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच सोलापूर ते पंढरपूर प्रत्येक महिन्याची वारी पायी करत असलेले ह.भ.प. दत्तात्रय महाराज भोसले तसेच लहान वयात राष्ट्रीय अध्यक्ष पद भूषवल्याबद्दल ह.भ. प. तुकाराम महाराज भोसले यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
वारकरी संप्रदायामधील युवक मोठा व्हावा यासाठी युवकांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे असे मत प्रदेशाध्यक्ष ज्योतीराम चांगले यांनी व्यक्त केले. वारकरी संप्रदाय बरोबर स्वतःचा व्यवसाय करणारी तितकच महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन माऊली लँडमार्कचे प्रमुख माऊली झांबरे यांनी व्यक्त केले..छत्रपती शिवाजी महाराज यांनी संत तुकाराम महाराजांची अनेक कीर्तन ऐकली असे मत दत्तात्रय महाराज भोसले यांनी केले..परिवारामध्ये वारकरी संप्रदाय रुजला पाहिजे असे मत उद्योजक राम कबाडे यांनी व्यक्त केले..शिवराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू वाडेकर यावेळी बोलताना म्हणाले आपण धर्मासाठी जगणे खूप महत्त्वाचे आहे..तरुण व्यसनमुक्त व्हायचं असेल तर फक्त वारकरी संप्रदायांमध्येच होऊ शकतो असे प्रतिपादन श्रीकांत डांगे यांनी बोलताना व्यक्त केले .ऑनलाईनचा प्रवाह असताना सुद्धा या पद्धतीचा उपयोग वारकरी युवकांनी पालखी सोहळ्यासाठी केला आहे व करावा असे दर्शन ढगे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले..
यावेळी ज्योतीराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष ), मोहन शेळके (प्रदेश सचिव), किसन कापसे (प्रदेश उपाध्यक्ष), तानाजी दादा बेलेराव (प्रदेश संघटक), बळीराम जांभळे, ज्ञानेश्वर भगरे ( जिल्हा अध्यक्ष), नागा पाटील, ई पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना गोविंद लोंढे यांनी केली. समिती रचनाकार्याध्यक्ष भाऊसाहेब बेलेराव यांनी मांडली तर आभार ह.भ. प.संजय महाराज केसरे यांनी केले.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह भ प कृष्णा महाराज चवरे यांनी केले. याप्रसंगी ऋषिकेश झांबरे, सचिन भोसले, अनिकेत जांभळे, समर्थ गायकवाड, अंकुश चौधरी, गोविंद ताटे, चैतन्य मोरे, ई. पदाधिकारी परिश्रम घेत होते.