सोलापूर : प्रभाग 26 मधील भाग्यलक्ष्मी पार्क येथे गेल्या अनेक वर्षापासून ड्रेनेजची समस्या भेडसावत होती. त्यामुळे नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी दखल घेऊन परिसराची पाहणी केली असता सर्वत्र ड्रेनेज ओवरफ्लो होऊन दुर्गंधी पसरलेली होती. पाहणी झाल्यानंतर नगरसेविका चव्हाण यांनी याबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करुन दिला. आता संपूर्ण नगरात ड्रेनेजचे जाळे पसरून सेफ्टी टँक मुक्त होणार असून आज त्या कामाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी पूजा कवडे, लंकेश्वर काका, आनंद पाटील, गीतांजली नारायणकर, गौरी हावळे, अर्चना बुरडे, आशा केदार, माने, जकापुरे, साखरे, तरंगे, पुजारी, बिराजदार, शिंदे, कविता जाधव, पाटील, परदेशी, ढसुदे, कुसुमडे, नारायणकर, दीक्षित, नेवलगी, चडचण, जाधव आजी, टेकाळे आदीसह नगरातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.