बँकांचा महिला बचत गटावरील विश्वास वाढला : मिनाक्षी मडिवळी
वडाळा : सध्या उमेद अंतर्गत असणाऱ्या महिला स्वयं सहाय्यता समुहांनी घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करीत आहेत. यामुळे महिला बचत गटांची पत वाढत आहे.यामुळेच सध्या राष्ट्रीयकृत बँकेचा महिला गटावरील विश्वास वाढला आहे.” असे मत उमेद अभियानच्या जिल्हा व्यवस्थापक मिनाक्षी मडिवळी यांनी महिला गटांना कर्ज वाटप कार्यक्रमात व्यक्त केले. आज रानमसले (ता.उ.सोलापूर) येथे उत्तर सोलापूर तालुका उमेद अभियान अंतर्गत महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले.
महिला स्वयं सहाय्यता समुहास व बँक आॕफ बडोदा वडाळा शाखेच्या वतीने विविध उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्यचे वाटप शाखेचे व्यवस्थापक विवेक बावीस्कर व उमेद अभियानच्या जिल्हा व्यवस्थापक मिनाक्षी मडिवळी यांच्या हस्ते धनादेश देऊन वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची सुरवात विद्येची देवता सरस्वती च्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्तर तालुका अभियान व्यवस्थापक पुनम दुध्याल यांनी बचत गटातील महिलांसाठी विविध शासकीय योजनेची माहीती दिली. तसेच उमेदचे जिल्हा व्यवस्थापक भगवान कोरे यांनी बचत गटासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनेची माहीती दिली.
बँकचे व्यवस्थापक विवेक बावीस्कर यांनी महिला बचत गटांनी वेळेत परतफेड केल्याने आता परत कर्ज वाटप करीत असून यापुढे ही अद्योग व्यवसायात प्रगती करावी.तसेच वेळेत कर्जाची परतफेड करावी. 10 लाखांपर्यंत कर्ज देऊ असे आश्वासन दिले. यावेळी उत्तर सोलापूरचे उमेद आभियानचे मिनाक्षी मडिवळी, भगवान कोरे, पुनम दुध्याल, पोपट चौधरी ,उषा तोंडसे ,बँकेचे मॕनेजर विवेक बावीस्कर , संग्राम घोगरे , रानमसलेच्या सरपंच वैशाली गरड, उपसरपंच सारिका गरड ,सुशांत गरड, उमेदच्या बचतगट प्रेरिका रोहिणी कुंभार , सोनम गजघाटे, अर्चना सचिन गरड ,लता शेरखाने , वर्षा वाघमारे , सुरेखा सुर्यकांत गरड,बालिका इंगळे सविता महेंद्र गरड , फातिमा शेख आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. शेवटी आभार प्रदर्शन पत्रकार दयानंद कुंभार यांनी मानले.
यावेळी रानमसलेतील 16 बचतगट बांधणीवरुन 48 बचतगट बांधणी करुन बचत गटातील महिलांचा सहभाग वाढवला .यानिमित्त जिल्हा व्यवस्थापक मिनाक्षी मडिवळी यांच्या हस्ते रोहिणी कुंभार व सोनम गजघाटे यांचा सन्मान करण्यात आला.
“महिला बचत गटांनी या अगोदर घेतलेले कर्ज वेळेत परतफेड केल्याने रानमसलेतील 27 महिला बचतगटांना 60 लाख,वडाळा येथील 9 बचत गटांना 24 लाख 50 हजार,वांगी येथील 4 बचतगटांना 10 लाख असे एकुण 40 महिला बचत गटांना 94 लाख 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले “
- विवेक बावीस्कर, शाखा व्यवस्थापक, (बँक आॕफ बडोदा वडाळा)