मागच्या दहा वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासन एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. या सरकारने युवक, महिला, शेतकरी, कामगार यांची केवळ फसवणूक करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी यावेळेस काँग्रेसला मतदान करून भाजपला त्यांची जागा दाखवा, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान केले आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेस, इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रणितीताई सुशिलकुमार शिंदे यांनी अक्कलकोट स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन गाव भेट दौरा सुरू केला. यावेळी प्रणिती शिंदे यांनी स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..”या शब्दात एवढी ताकद आहे की, कोणतेही आव्हान ऊचलण्यासाठी एक प्रकारची ताकद यामुळे मिळते. त्यामुळे मला नक्कीच स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अक्कलकोटसह सोलापुर लोकसभेतील जनतेची सेवा करण्याची संधी मिळेल, अशा भावना यावेळी प्रणिती शिंदे यांनी व्यक्त्य केल्या.या भावना व्यक्त केल्या.
या दौऱ्यावेळीवेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, तालुका अध्यक्ष शंकर म्हेत्रे, प्रथमेश म्हेत्रे, शितलताई म्हेत्रे, मल्लिकार्जुन पाटील, रईस टीनवाला, अशफाक बलोरगी, शिवसेना अध्यक्ष आनंद बुक्कानुरे, राष्ट्रवादी अध्यक्ष बंदेनवाज कोरबु, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष माया जाधव, बाबासाहेब पाटील, मनोज यलगुलवार, रवी वरनाळे, मुजीब नदाफ, आरिफ कुरेशी, काशिनाथ कुंभार, सुरेखा पाटील, ईरान्ना धसाडे, प्रवीण शटगार, तिरुपती परकीपांडला, नितीन ननवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
“अक्कलकोट तालुक्यात प्रणिती शिंदे यांना मताधिक्य देणार
प्रणिती शिंदे यांनी विधानसभेत मतदारसंघातील महिला, युवक यांच्या प्रश्नासह ग्रामीण भागातील टकरी शेतकऱ्यांच्याही प्रश्नावर आवाज उठवलेला आहे. जर ते विधानसभेत असताना लोकांचे इतके प्रश्न मांडत असतील तर त्या लोकसभेत गेल्यानंतर संपूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न त्या हिरीरीने मांडतील. त्यामुळे मतदारसंघातील युवक, महिला ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात मतदान करून प्रणिती शिंदे यांना साथ द्यावी, असे आवाहनही माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी मतदारांना केले आहे.
तसेच सरकारकडून शेतकरी, असंघटित कामगार, युवा वर्ग सरकारी कर्मचारी, यांना केवळ आश्वासने देऊन फसवणूक केली आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत या अन्यायी सरकारला तडीपार करण्यासाठी प्रणितीताई शिंदे यांना अक्कलकोट तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देणार असल्याचा विश्वासही माजी म्हेत्रे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या अक्कलकोट दौऱ्यात प्रणिती शिंदे म्हणाल्या की, लोकांनी भाजपच्या आश्वासनाला भुलून भाजपला भरभरून मते दिली. पण भाजपने जनतेचा अपेक्षाभंग केला एक ही आश्वासन पूर्ण केले नाही. युवकांची बेरोजगारी वाढत आहे महागाई वाढत आहे. दुसरीकडे शेतीमालाला हमीभाव मिळाला नाही. खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. शेतीसाठीच नाही तर जनावरांसाठी देखील पाणी मिळणे कठीण झाले आहे. चारा छवण्या नाहीत. मात्र भाजपाचे लोकप्रतिनिधी यावर बोलणार नाहीत. कारण तिथे हुकूमशाही आहे. म्हणूनच यावेळी आपल्याला ही हक्काची लढाई जिंकायची आहे. म्हणूनच मागील दहा वर्षाचा वचपा काढण्यासाठी तुम्ही मला सोलापूरची लेक म्हणून आशीर्वाद स्वरूपात मतदान करा, असे आवाहनही प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोटकरांना केले.
एकीकडे भाजप ४०० पारच्या घोषणा देत आहे. मात्र भाजप सध्या घाबरलेला आहे. त्यामुळेच भाजपकडून अरविंद केजरीवालांना एका दिवसात अटक करण्यात आली. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. काँग्रेसची खाती गोठवण्यात आली. मात्र हे करण्याची तुम्हाला गरज का भासली? असा सवाल करत प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.