येस न्युज मराठी नेटवर्क : तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार दिनेश त्रिवेदी यांनी शुक्रवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आपल्या पक्षाला मोठा झटका दिलाय. अतिशय नाट्यमय पद्धतीने दिनेश त्रिवेदी यांनी राज्यसभेत आपला राजीनामा सादर केला.पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ ची रणधुमाळी सुरू असताना थेट राज्यसभेत ही घटना घडल्याने पक्षाच्या पायाखालची जमीनच सरकली.
तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते समजले जाणाऱ्या दिनेश त्रिवेदी यांनी राज्यसभेच्या कामकाजा दरम्यान आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.’प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा त्याला आपल्या अंतरआत्म्याचा आवाज ऐकू येतो. अध्यक्ष महोदय, माझ्याही आयुष्यात आज अशीच वेळ आलीय. मी माझ्या पक्षाचा आभारी आहे ज्यांनी मला इथे पाठवले आहे. पण आता मला इथे घुसमटतय . तिथे अत्याचार सुरु असताना आम्ही काहीही करू शकत नाहीत. म्हणून माझा आतला आवाज सांगतोय की इथे चूपचाप बसून रहा आणि काहीही बोलू शकत नसाल तर राजीनामा हाच सर्वोत्तम मार्ग आहे, असं म्हणत दिनेश त्रिवेदी यांनी आपला राजीनामा सादर केला.करोना संक्रमणकाळात हिंदुस्तानाने ज्या पद्धतीने पुढे वाटचाल केली ती अवघ्या जगाने पाहिली. सर्वांनी एकत्र येऊन याचा सामना केला परंतु, याचे नेतृत्व मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं, असं म्हणत आपल्या त्रिवेदी यांनी पंतप्रधानांवर कौतुकस्तुमने उधळलेली पाहायला मिळाली.