सोलापूर: आ.विजय देशमुख यांनी जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी 61 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे स्मारक सुशोभीकरणाच्या अनुषंगाने आ .विजय देशमुख यांनी महापालिका अधिकाऱी व जगतज्योती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत स्मारक परिसराची पाहणी केली यावेळी महात्मा बसवेश्वर स्मारकाचे काम जन्मोत्सव नंतर लगेच सुरू करावे यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी त्यांच्या समवेत जगतज्योती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाचे अध्यक्ष संदीप दुगाणे नागेश भोगडे, महापालिकेचे आवेक्षक अभिजीत बिराजदार, महेश केसकर, सचिन कुलकर्णी, बिपीन धुम्मा, गणेश साखरे, शिवशरण साखरे, प्रेम भोगडे,शिवराज झुंजे, आशिष दुलंगे, प्रवीण दर्गोपाटील, नागेश यळमेळ्ळी, गुरुराज पदमगोंडा, कार्तिक उपासे, यांच्यासह बसव प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते…
