येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने आयोजित स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत अक्कलकोट तालुक्याचे गटविकास अधिकारी भारत ऐवळे यांचा त्रिसदस्यीय टीम नागणसुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींची शाळेला भेट देऊन तपासणी करून निसर्गरम्य शालेय वातावरण आणि शालेय कामकाजबद्दल समाधान व्यक्त करून सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले.
कोरोना महामारी मुळे दोन वर्षांपासून शाळा बंद असून शालेय परिसर अस्वच्छ झाल्याने आणि शालेय परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने स्पर्धा आयोजन करून जिल्ह्यातील सर्वच शाळा सुंदर करण्यासाठी शिक्षक, पालक,ग्रामस्थ,सरपंच,उपसरपंच,शालेय व्यवस्थापन समिती मधील सदस्य युवकवर्ग काम करत असून उत्कृष्ट शाळेला शाबासकीची थाप देण्यासाठी तालुक्यातील पहिली ते आठवी शाळा मध्ये नागणसुर कन्नड मुलींची शाळा सुंदर कार्य केल्यामुळे आज बीडीओ साहेब आणि त्यांचे टीम शाळेला येऊन गुणांकन तक्त्याप्रमाणे बारीक बारीक गोष्ठी पडताळणी केले.आवश्यक असलेले काम पूर्ण करून देण्यासाठी सूचना केले.शालेय सुंदर परिसर,लोकसहभागातून केलेलं कामे,एकपद, एक वृक्ष,परसबाग,ईलर्निंग सुविधा,पाणी पुरवठा,हॅन्ड वाश,शालेय अभिलेखे,ऑफलाईन शिक्षण, ऑनलाईन शिक्षण,कचरा व्यवस्थापन,पार्किंग,प्रवेशद्वार आदी विषय तपासून समाधान व्यक्त केले.आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिले.
बीडीओ बरोबर केंद्र प्रमुख गुरुनाथ नरुणे साहेब उपस्थित होते.शालेय परिसर सुंदर आणि आकर्षक करण्यासाठी प्रयत्नशिल असलेले मुख्याध्यापक शांता तोळणूरे,कल्लय्या गणाचारी,जिंनेदभाषा नदाफ,विषय शिक्षक शरणप्पा फुलारी, लक्ष्मीबाई देगांव, लक्ष्मीबाई दोडमनी यांना बीडीओ भारत ऐवळे यांनी अभिनंदन केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिले.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य बसवराज मंटगी,रुद्रमुनी कोनापुरे, चंद्रकांत मायनाळे, मराठी शाळेच्या मुख्याध्यापक पुंडलिक कलखांबकर,बसवराज खिलारी,माळवदकर ,मुश्रीफ शेख,किरण खसकी,मलगणकर आदी उपस्थित होते