सोलापूर,(प्रतिनिधी):- पूज्य हनगल श्री कुमार शिवयोगींच्या जीवनावर आधारीत विराटपूर विरागी या चित्रपटाचा प्रिमियर शो गुरूवार दि. 12 जानेवारी रोजी प्रभात थिएटरमध्ये होणार असून रेग्युलर शो दररोज सायंकाळी 6 वाजता ई स्क्वेअर चित्रपट गृहात सुरू राहणार असल्याची माहिती सिध्देश्वर किणगी आणि डॉ. शरणबसप्पा दामा यांनी दिली.
स्वातंत्र्यपूर्व काळात संघठीत नसलेल्या समाजाला एकत्र करून त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विविध शिक्षण संस्थांची उभारणी करण्यात आली. स्वातंत्र्य पूर्व काळात म्हणजेच आताच्या पाकिस्तानातील कराची येथून हिंदुस्थानी संगित कलेचे तज्ञ उस्ताद अब्दुल वहिद खान तसेच कर्नाटकातील निलकंठ बुआ के व्यंकटरमणय्या यांना बोलावून घेत पंचाक्षरी गवई यांना संगित कलेचे ज्ञान मिळवून दिले
सामाजिक समता वचन साहित्य संग्रहालय निर्मिती अंध अपंग व्यक्तींना संगीत शिक्षण, स्त्रियांना शिक्षण आणि त्यांचे सबलीकरण करून अखिल भारतीय वीरशैव महासभेची स्थापना तसेच शिवयोग मंदिराची स्थापना,ताड पत्रावरच शिवशरणांच्या वचनांचा संग्रह, गोशाळा,विभुती,इष्टलिंग तयार करणे, मुंबईहून पहिल्यांदाच ट्रॅ्नटर आणून शेतकऱ्यांना आधुनिक शेती बदलाची माहिती करून दिली, प्राणी बली निषेध मानून कार्य केले, आयुर्वेद चिकित्सालय याचबरोबर चित्रपट गृह निर्मिती अशा विविध क्षेत्रात अपुऱ्या साधन सामग्रीतून भरीव कामगिरी करून लोकाभिमुख व्यक्तीमत्व म्हणून परिचित असलेले हनगल श्री गुरू कुमार शिवयोगीजी यांचे जीवन चरित्र जगभरातील लोकांपर्यत पोहोचावे आणि लोकांना मार्गदर्शक व्हावे म्हणून परम पूज्य मौनतपस्वी श्री जडेय शांतलिंग महास्वामीजींच्या कृपाशिर्वादाने आणि प्रेरणेने गुरूदेव सेवा संस्था संचलित समाधान केंद्राच्या माध्यमातून पूज्य हनगल श्री कुमार शिवयोगींचे जीवन चरित्रावर चित्रपट तयार करण्यात आला आहे. हा चित्रपट दि. 13 जानेवारी पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा प्रिमियर शो सोलापूर मधील प्रभात चित्रपट गृहात गुरूवार दि. 12 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता तर ई स्क्वेअर मधील स्क्रीन 2 आणि स्क्रीनवर सकाळी 9, दुपारी 12,3, सायंकाळी 6 आणि रात्री 9 से दिवसभर शो होणार आहेत. त्याचबरोबर शुक्रवार दि.13 जानेवारी पासून दररोज सायंकाळी 6 वाजता सोलापूरमधील ई स्क्वेअर मध्ये विराटपूर विरागी हा चित्रपट स्क्रीन 2 वर सायंकाळी 6 वाजता राहणार असून भाविक भक्तांनी हा चित्रपट पाहून आपल्या आयुष्यातील चांगला अनुभव घ्यावा असे आवाहन सिध्देश्वर किणगी आणि डॉ. शरणबसप्पा दामा यांनी केले.
कुमार शिवयोगींचा सोलापूरशी ऋणानुबंध-
नालतवाडचे वीरेश्वर शिवशरण यांची अंतिम इच्छा होती की कुमार शिवयोगी यांनी मला दर्शन द्यावे त्या इच्छेनुसार कुमार शिवयोगी यांनी सोलापूरला रेल्वेने येवून वीरेश्वर शिवशरण यांना दर्शन दिले त्यानंतर शिवशरण हे लिंगै्नय झाले. कुमार शिवयोगी हे कायम पायी किंवा बैलगाडीने प्रवास करायचे परंतु आयुष्यात त्यांनी एकदाच सोलापूरला येताना रेल्वेने प्रवास केला. त्याचबरोबर सोलापूरचे सुपुत्र पुण्यश्लोक मल्लप्पा वारद यांच्याशीही त्यांचा ऋणानुबंध होता.
हा चित्रपट मनोरंजनासाठी नसून लोकांना मार्गदर्शक आणि भावी पिढीच्या जीवनातील पथदिशा दर्शक व्हावे म्हणून लोक वर्गणीमधून लोकांच्यासाठी आणि लोकांकडून निर्मिती केलेला हा चित्रपट प्रत्येकाला मार्गदर्शक राहणार आहे. या चित्रपटाची निर्मिती समाधान आश्रमाकडून करण्यात आली तर रचना आणि निर्देशन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक बी एस लिंगदेवरू यांनी केली आहे. तर मुख्य भुमिकेत सुचेंद्र प्रसाद आहेत. संगीत मणीकांत कदरी, छायाचित्रण अशोक वि.रामन, संकलन एस गुणशेखरन, वेषभुषा शंकर एच. बी., प्रसाधन रमेश बाबु, लाईट सेल्व, पाव आऊटडोअर युनिट यांचे आहे. या चित्रपटातील काही कलावंत सोलापूरमधील आहेत जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पहावा असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी प्रकाश खोबरे, महेश पाटील, संगनबसप्पा स्वामी, सोमशेखर तेल्लूर, मल्लू बिराजदार, आदींसह मोठ्यासंख्येने भक्त उपस्थित होते.