अक्कलकोट मतदारसंघातील नागोरे गावांत महायुतीचे उमेदवार आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ बैठक घेतली गेली. गेल्या 5 वर्षात गावासाठी केलेले काम गावकऱ्यांना सांगून भाजप-महायुतीला मतदान करावे अशी यावेळी त्यांनी विनंती केली.
नागोरे गावात अण्णाभाऊ साठे नगर येथे बंदिस्त गटार बांधकाम, गावांतर्गत सिमेंट रस्ता, मुस्लिम स्मशानभूमी संरक्षक भिंत बांधकाम, चौडेश्वरी मंदिरासमोर सभागृह बांधकाम, अंबाभवानी आणि काळम्मादेवी मंदिरासमोर सभा मंडप बांधकाम, नागोरे- इब्राहिमपूर- मुळगी रस्ता, जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा सवय अशी कामे पूर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे सुनील बंडगर शेत ते तूकप्पा नागुर शेतापर्यंत खडीकरण व मुरुमीकरण करणे आणि संत सेवालाल मंदिरासमोर सभा मंडप बांधकाम या कामांना मंजुरी मिळालेली आहे.
यावेळी मोतीराम राठोड, सिद्धाराम बाके, सैदप्पा झळकी, अविनाश मडीखांबे, विजयकुमार नागोरे, गंगाराम चव्हाण, गुरण्णा दणुरे, शिवनिंगप्पा निंबाळ, बिरप्पा पुजारी, गुंडप्पा कुंभार, प्रकाश अलमद, विकास टोणगे, अप्पाराव टोणगे, श्रीकांत नागोरे आदीसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.