सोलापूर : महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांची बदली पदोन्नतीपर बदली झाल्याने या रिक्त जागी मा.विद्या पोळ गुरुवारी रुजू झाल्या.मा.विद्या पोळ या मूळच्या सातार्याच्या असून सन 2010 च्या बॅचच्या अधिकारी आहेत. सुरुवातीला त्यांची सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाली. तद्नंतर त्यांनी सन 2013 ते 2016 या काळात पाचगणी न.पा.च्या मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले. तेथून त्यांची वाई न.पा.मध्ये बदली झाली. वाईनंतर त्यांनी कोल्हापूर महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून काम केले. आठ दिवसांपूर्वीच त्यांची नागपूर महापलिकेत उपायुक्तपदी पदोन्नतीपर बदली झाली होती, मात्र बुधवारी त्यांची सोलापूरला बदली करण्यात आली. गुरुवारी त्यांनी मावळते उपायुक्त धनराज पांडे यांच्याकडून उपायुक्तपदाची सुत्रे हाती घेतली.