सोलापूर : शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या वेळी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सोलापुरात जुळे सोलापूर भागात एक अद्यावत नाट्यगृह बांधू अशी घोषणा केली होती. त्याच अनुषंगाने सोलापुरात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी सोलापूरचे उपयुक्त आशिष लोकरे यांची भेट घेऊन या विषयाची दखल घेण्याची विनंती त्यांना केली.
यावेळी आशिष लोकरे यांनी आगामी महिनाभरामध्ये जागा फायनल करून पुढच्या कामाला लगेच लागू असे आश्वासनही दिले. याप्रसंगी नाट्य परिषद नियमक मंडळाचे कार्यकारणी सदस्य व सोलापुरातील उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंके, नियामक मंडळाचे सदस्य सुमित फुलमामडी,महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, अविनाश महागावकर अमोल धाबळे, लक्ष्मण उपरे आदी उपस्थित होते.