सोलापूर दिनांक – पंतप्रधान आवास योजना अंतर्गत शहरी भागातील 30 हजार असंघटीत कामगारांना एकाच ठिकाणी परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर रे नगर फेडरेशन, म्हाडा यांच्या पुढाकरातून जगातील एकमेव अभिनव अशा 30 हजार घरांचा महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे. या गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्पातील 15 हजार घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने जाहीर सभा होणार आहे. याच्या पूर्वतयारी करीता शनिवारी रे नगर कुंभारी येथे मा.जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक ग्रामीण,म्हाडा संबधित सर्व अधिकारी, रे नगर मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर,रे नगर चे सचिव युसुफ मेजर विकासक अंकुर पंधे आदी समावेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे ठिकाण व हेलिपॅड ची आज 27 डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा चाचपणी करण्यात आली.
यावेळी मा.जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना जाहीर सभेचे ठिकाण व हस्तांतरण सोहळ्यासाठी बनवण्यात येणाऱ्या हेलिपॅड ची व्यवस्था आदींची माहिती देण्यात आली.
यानंतर मा.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मा.पोलीस अधीक्षक गिरीष सरदेशपांडे यांनी कुंभारी येथील रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभेचे ठिकाण व सभेसाठी येणाऱ्या नागरिकांची बैठक व्यवस्था तसेच भारत सरकार शिष्टाचारा प्रमाणे सोहळ्यास उपस्थित राहणारे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री, केंद्रीय रस्ता मंत्री, मा.राज्यपाल,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,राज्य गृहनिर्माण मंत्री,पालकमंत्री,म्हाडा व संबधित सर्व मंत्री अधिकारी यांच्या वाहनाची सोय करण्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करणे व त्याची सर्व सुरक्षा यंत्रणा निश्चित करणे याबाबत प्रत्यक्ष क्षेत्र सर्वेक्षण करण्यात आले तसेच प्राधान्याने पंतप्रधान यांच्या आगमनासाठी हेलिकॉप्टर कोठे उतरले पाहिजे , हेलिपॅड कोठे असले पाहिजे याचे तीन ठिकाणे व सुरक्षा यंत्रणा व ताफा याची दुसऱ्यांदा चाचपणी करण्यात आली.
अत्यंत वेगवान पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी दिली.