येस न्युज मराठी नेटवर्क : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे डॉ वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांना अपंग व्यक्तींना अपंग प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळण्यासाठी व त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी,तसेच अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी वेळेत देखील वाढ करण्यात यावी यासाठी भारतीय विद्यार्थी सेना तर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख लहुजी गायकवाड उपजिल्हा प्रमुख अनिरुद्ध दहीवडे, मल्लिकार्जुन येणपे जिल्हा सचिव रोहित अक्कलकोटे उपतालुका प्रमुख अक्षय गायकवाड व उमाकांत सुपाते हे उपस्थित होते