सोलापूर – वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ अंतर्गत, पैलवान कै. मारूती चव्हाण- वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ,(उपकंपनी) तसचे राजे उमाजी नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ मुख्य कंपनी सोलापूर या कार्यालया मार्फत विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ संबधितांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक किरण गिऱ्हे यांनी केले आहे.
कार्यालयामार्फत बीज भांडवल कर्ज योजना, 1 लाख रूपये थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज तरतावा योजना राबविण्यात येत आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून व्याज परतावा योजनेत संपूर्ण कर्ज बँकेचे राहील तथापि कर्जाचे हप्ते नियमित पणे भरल्यास कमाल 12 टक्क्यांपर्यंतचे व्याज महामंडळ लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. व्याज परतावा योजना ऑनलाईन स्वरूपाची आहे. ऑनलाईन योजनेअंतर्गत www.vjnt.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी हा पर्याय निवडून ऑनलाईन अर्ज भरावा आवश्यक कागदपत्रे पार्टवर सादर करावीत. 1 लाख थेट कर्ज योजने मध्ये संपूर्ण कर्ज महामंडाळाकडून दिले जाणार आहे. लाभार्थीने रू.2085 चा नियमित 48 समान मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करण्याऱ्या लाभार्थिना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकित हप्त्यांवर द.सा.द.शे. 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल.
अधिक माहितीसाठी महामंडळाचे सोलापूर जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , दुसरा मजला,सात रस्ता, सोलापूर दुरध्वनी क्र. 0217-2992080 येथे संपर्क करावा तसेच महामंडळाची वेबसाईट www.vjnt.in पहावी असे आवाहनही जिल्हा व्यवस्थापक किरण गिऱ्हे यांनी केले आहे.