सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्व. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटिल यांच्या जयंती दिनानिमित्त सिव्हिल चौक येथील स्व.पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सहाय्यक आयुक्त सुनील माने यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी गौस पटेल,राजेंद्र कोरे, कासीम शेख, प्रेमनाथ सज्जन, सुरेश लिंगराज, मोरे आदी मान्यवर उपस्थित मान्यवर उपस्थित होते.