येस न्युज मराठी नेटवर्क : लष्कर भागातील सामाजिक कार्यकर्ते दिवंगत करण म्हेत्रे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मित्र परिवारांना विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. 1 हजार रक्तदाते रक्तदान शिबिरात भाग घेतील अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
सोमवार दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी करण म्हेत्रे यांचा जन्म दिवस आहे. याचा औचित्य साधून भरारी मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था तसेच लष्कर भागातील विविध मंडळांनी एकत्र येऊन कार्यक्रमांचं आयोजन केलय. यात आरोग्य शिबिर, दिनांक 8 आणी 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत होईल. रविवार दिनांक 10 रोजी व्यसनमुक्ती संबोधन शिबिर होणार आहे. अनाथाश्रमात खाऊ वाटप तसेच साहित्य भेट हा कार्यक्रम सोमवार दिनांक 11 ऑक्टोबरला होईल. 11 ऑक्टोबरलाच सायंकाळी 6 वाजता श्रद्धांजलि कार्यक्रम होईल. रक्तदान शिबिर बुधवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. हे सर्व कार्यक्रम लष्कर, जांबमुनी चौक येथील युवक बिल्डर्स क्लब येथील करण म्हेत्रे यांच्या ऑफिस मध्ये होतील. पत्रकार परिषदेस विश्वनाथ मेहेत्रे, आकाश मुदगल, अतुल शिरसाठ, प्रकाश कुमार,अतिश म्हेत्रे , सुरेश फरड आदी उपस्थित होते.