अक्कलकोट : कोरोनाच्या महामारीमुळे गेली दोन वर्षे गौडगांव येथील दक्षिणमुखी जागृत मारूती मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आले नव्हते.शासनानी कोरोनाचे निर्बंध उठवल्याने यंदा मात्र हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यानी दिली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील गाैडगांव येथील दक्षिण मुखी जागृत मारूती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त १५, १६, तारखेला विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन १५ तारखेला शुक्रवारी भजन,किर्तन व श्रीस महारूद्राभिषेक, नवग्रह पुजा,शनिपुजन,अभिषेक व गजलक्ष्मी महापूजा, होमहवन यज्ञचा कार्यक्रम पार पडणार आहे. १६ तारखेला शनिवारीच हनुमान जयंतीचा योग आल्याने त्याच दिवसी मारूतीस महारूद्राभिषेक, शनिपुजन, महापूजन,होमहवन,यज्ञ व भजन, किर्तन व पाळणा कार्यक्रमासह सकाळी वाद्यवृंदाचा पालखीची भव्य मिरवणूक निघणार आहे.
मंदिर समितीच्या वतिने दर्शनाकरिता आलेल्या भाविकांना जागृत मारूतीचे हनुमान चाळीसा, हनुमान पुस्तक व हनुमान फोटो देण्यात येणार आहे. ९ वाजता श्रीच्या भव्य पालकी सोहळा व दुपारी १२ वाजता विशेष महाआरतीचा कार्यक्रम होणार आहे. हनुमान जयंतीनिमित्त मारुती च्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना, मंदिर समितीच्या वतीने
महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविक भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे अवाहान कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत खानापूरे यांनी केले आहे.