शि. प्र. मंडळ कुमठेचे संस्थापक ब्रह्मदेवदादा माने यांच्या २३ व्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक ३ ते ५ सप्टेंबर २०२५ दरम्यान अभिवादन सभेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे मुख्य विश्वस्त जयकुमार माने यांनी दिली.


या कार्यक्रमाची सुरुवात बुधवार, दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता अभिवादन सभेने होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ विधिज्ञ ऍड धनंजय माने भूषवणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, संस्थापक संचालक, चाणक्य मंडळ, पुणे उपस्थित राहून “जिंकण्यासाठी करिअरची तयारी” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव माने उपस्थित राहणार आहेत.
तसेच गुरुवार दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध AI तज्ञ व शिक्षण सल्लागार डॉ. भूषण केळकर यांचे “AI आव्हाने आणि संधी” या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. या सत्राचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्था साताराचे विभागीय संचालक संजीव पाटील भूषवणार आहेत.
शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता ज्येष्ठ सनदी अधिकारी (IAS) रमेश घोलप यांचे “प्रयत्नांनीच उजळतात वाटा” या विषयावर मार्गदर्शन होणार असून, सदर सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. नितिन हबीब हे भूषवणार आहेत. त्याचबरोबर संस्थेतर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून काही मान्यवर मुख्याध्यापक यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापकांची नावे पुढीलप्रमाणे:
1) निलीमा सिताराम भांगे, श्री सिद्धाराम म्हेत्रे प्रशाला, नवीन घरकुल
2) शिवानंद भीमशा बिराजदार, श्री बसवराज माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, करजगी
3) संध्या विश्वनाथ कुणाळे, श्री मल्लाप्पा कोणापुरे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, आहेरवाडी
4) गंगाधर भागवत डोके, न्यू इंग्लिश स्कूल दोड्डी
5) इरफान अब्दुल रशीद जानवाडकर, आयडियल उर्दू हायस्कूल, सोलापूर
याच दिवशी सायं. ६ वा. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. श्री. पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे हरिकिर्तन होणार आहे.
यासर्व कार्यक्रमांना विद्यार्थी, पालक व कुमठे परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शि. प्र. मंडळ कुमठेचे मुख्य विश्वस्त जयकुमार माने यांनी केले आहे.
सदर पत्रकार परिषदेसाठी संस्थेचे अध्यक्ष मा आ दिलीपराव माने मालक, मुख्य विश्वस्त जयकुमार माने, बँकेचे संचालक आनंदराव देठे, शिवाजी घोडके पाटील, एस पी एम चे प्रा ज्ञानेश्वर जाधव, लिटिल स्टार चे समन्वयक मलकारी कोरे आदीची उवस्थिती होती.