सोलापुर – विविध वस्तू विक्री कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने रविवार दिनांक 4 मे रोजी सायंकाळी सहा वाजता सोलापुरातील हॉटेल ऐश्वर्या या ठिकाणी नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण सोहळा तसेच विक्री प्रतिनिधींचा मेळावा आयोजित केला आहे.
आमदार विजयकुमार देशमुख तसेच आमदार देवेंद्र कोठे आणि विविध वस्तू विक्री कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन चे कार्याध्यक्ष राहुल मुंगले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचे माहिती संघटनेचे विशेष सल्लागार श्रीकांत हवळगी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस साईनाथ भिमर्थी ,व्यंकटेश लचमापुरे, महेश करंटे, उमेश गायकवाड, श्रीकांत नसली, इस्माईल हुलसुरे, शिवलिंग गुदगे आदी उपस्थित होते