सोलापूर – सुशील कराडवर सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही असं सांगत बीड न्यायालयात त्याच्या विरोधात दाद मागावी असा आदेश सोलापूर न्यायालयाने दिला आहे. वाल्मिक कराडच्या मॅनेंजरच्या घरात घुसून त्याला मारहाण करणे, त्याच्या अल्पवयीन मुलीला मारहाण करणे तसेच बंदुकीचा धाक दाखवून दोन बल्कर, दोन कार आणि सोने नेल्याचा आरोप करण्यात आला होता.
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्या विरोधात पीडित महिलेने सोलापुरात फिर्याद दाखल केली होती. दाखल केलेल्या खासगी फिर्यादनुसार संपूर्ण घटनाक्रम हा बीड जिल्ह्यातला असल्याने पीडित महिलेने बीड जिल्हा न्यायालयात दाद मागण्याचे सोलापूर न्यायालयाने आदेश दिले.
पीडित महिलेच्या मागणीनुसार सुशील कराड विरोधात सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही. संपूर्ण घटनाक्रम हा बीड जिल्ह्यातील असल्याने सोलापूरच्या हद्दीत गुन्हा दाखल करता येणार नाही असे कोर्टाचे आदेश आहेत.