सोलापूर : उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्या १० जून रोजी महापालिकेच्या मदर तेरेसा पॉलीक्लिनिक डफरीन चौक येथे सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड, पासपोर्ट, स्टुडंट व्हीसासाठी केलेला अर्ज , संबंधित विद्यापीठाचे ऑफर लेटर आणि 20 ds-160 फॉर्म घेऊन डफरीन चौकातील मदर तेरेसा पॉलिक्लिनिक मध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. पदवीपूर्व व पदव्युत्तर आणि पीएचडीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे लसीकरण करण्यात येणार आहे.