सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून तसेच वंचित बहुजन आघाडीचे गटनेते नगरसेवक आनंद दादा चंदनशिवे यांच्या विशेष प्रयत्नातून मोफत लसीकरण केंद्र बुधवार पेठ परिसरातील सम्राट चौक येथील सेठ गोविंद रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय मध्ये सुरू करण्यात आले.
सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना सोशल डिस्टन्स लसीकरण संबंधी सूचना दिल्या.
यावेळी 330 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी , हर्षल कोठारी, अनिल जैन, श्रेनिक कोचर ,पुरुषोत्तम धुत प्रभूराज मैंदर्गी, शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय चे विश्वस्त डॉ. आदर्श मेहता, प्रशासकीय अधिकारी अनुप जोशी, प्राचार्य विद्यानंद कुंभोजकर ,मेडिकल ऑफिसर अविनाश चव्हाण सर, मेडिकल ऑफिसर प्रदीप कस्तुरे सर, कासार सिस्टर, क्लार्क दिपक समर्थ ,सुभाष राठोड ,शिपाई उमेश तिवारी, शिपाई कविता गवळी, शिपाई सुरज गायकवाड, शिपाई वासुदेव शिरनाळ , शिपाई जयपाल वसजडेकर, सोलापूर महानगरपालिका विभागीय कार्यालय क्रमांक 1 चे कनिष्ठ लिपिक पांडुरंग सोनवणे, कनिष्ठ लिपिक सुहास कुलकर्णी ,अवेक्षक राहुल म्हेत्रे आरोग्य निरीक्षक विजय साळुंखे इत्यादी उपस्थित होते
सदर लसीकरण केंद्र ठिकाणी सोशल डिस्टंसिंग चे पालन तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. या लसीकरण केंद्रामुळे बुधवार पेठ मिलिंद नगर परिसरातील नागरिक तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर जय मल्हार चौक सम्राट चौक महेश नगर भगवती सोसायटी साठे चाळ मोठे वस्ती प्रभाकर वस्ती सफाई कामगार वसाहत रमाबाई आंबेडकर नगर झवर मळा नाकोडा नगर येथील नागरिकांना सोयीचे ठरणार आहे तसेच ऑनलाइन रजिस्ट्रेशन साठी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांचे संपर्क कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केले