४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी आज लसीकरण
येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर महानगरपालिका covid-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत मंगळवारी २५ मे रोजी महापालिकेच्या ३१ लसीकरण केंद्रांवर तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पंचेचाळीस वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण करण्यात येणार आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या लोकांसाठी पहिला डोस २२५ व्यक्तींना देण्यात येणार आहे. तर ऑन स्पॉट पहिला डोस २५ व्यक्तींना देण्यात येईल. ऑन स्पॉट दुसरा डोस २० व्यक्तींना देण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रांवर एकूण २७० डोस देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
