उत्तरप्रदेशात आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका, २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून रणनीती आखण्यात येत आहे.
यासाठी ठिकठिकाणी बैठकांचे आयोजन केले जात आहे. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी उत्तरप्रदेशात ‘गुजरात मॉडेल’ राबविण्यात येत आहे
गुजरातमध्ये यापूर्वी २०१७ च्या विधानसभा निवडणूक आणि २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत “गुजरात मॉडेल” यशस्वी ठरले आहे. रविवारी लखनौमध्ये भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि भाजपाच्या विभागीय संघटनांच्या अध्यक्ष यावेळी उपस्थित होते. गुजरातमध्ये सातव्यांदा भाजप सत्तेत येत असताना भाजपने तेथे केलेली कामगिरी याबाबत मुख्यमंत्री योगी यांनी यावेळी माहिती दिली.
भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे अध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी यांनीही ‘गुजरात मॉडेल’विषयी माहिती दिली. गुजरात मॉडेलला घेऊन उत्तर प्रदेश भाजप कार्यकारिणीने आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. या अंतर्गत सर्व जिल्हे आणि विभागीय घटकांच्या कार्यकारी समितीच्या बैठकीतही चर्चा केली जाणार आहे.
उत्तर प्रदेशात येत्या १२ फेब्रुवारीपर्यंत विविध पातळ्यावर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत ज्या ठिकाणी कमी जागा निवडणूक आल्या आहेत. त्या ठिकाणी भाजपने जोर लावला आहे.