• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सचिन वाझे कोणाच्या दबावाखाली होते? केंद्रीय मंत्र्यांचा सवाल

by Yes News Marathi
March 21, 2021
in मुख्य बातमी
0
सचिन वाझे कोणाच्या दबावाखाली होते? केंद्रीय मंत्र्यांचा सवाल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क :मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या बॉम्ब प्रकरणाची चौकशी जस जशी पुढे जात आहे तसे महाराष्ट्रातील राजकीय भूकंपही वाढत आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रा नंतर मोठे राजकीय चेहरे या प्रकरणाशी संबंधित असल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला विचारले की सचिन वाझे कोणाच्या दबावाखाली होते? शिवसेना, मुख्यमंत्री की शरद पवार?

पत्रकार परिषदेदरम्यान रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘मुंबईचे माजी पोलिस आयुक्तांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पत्र लिहिले आहे, ज्यात ते म्हणाले आहेत की महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री यांनी सचिन वाझेंना १०० कोटी रुपये जमा करून द्या असे सांगितले होते.

ते पुढे म्हणाले, ‘सचिन वाझे यांना बरीच वर्षे निलंबित करण्यात आले होते, अनेक वर्षांनंतर त्यांची कोरोना काळात पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती आणि असं म्हणतात की कोरोनामध्ये मोठ्या संख्येने पोलिस आजारी पडले आहेत म्हणून त्यांना पुन्हा कामावर घेतले जात आहे. भाजपाकडून पहिला प्रश्न हा आहे की, सचिन वाझे यांना कोणाच्या दबावाखाली नेमले गेले?

कायदामंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, हा भ्रष्टाचाराचा मुद्दा नाही. हा लुटण्याचा प्रकार आहे. ते म्हणाले की खंडणी हा गुन्हा आहे आणि या प्रकरणात शरद पवार यांना माहिती दिली जात असेल तर शरद पवार सरकारमध्ये नसतानासुध्दा त्यांना कोणत्या आधारावर माहिती दिली जात आहे आणि असा प्रश्न देखील पडतो की हा गुन्हा थांबवण्यासाठी आणि या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी शरद पवारांनी त्यांच्या स्तरावर काय कारवाई केली आहे?

Previous Post

डॉ.पतीविरुद्ध विवाहितेची शिवीगाळ व मारहाण केल्याची फिर्याद

Next Post

परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर – शरद पवार

Next Post
परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर  – शरद पवार

परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर - शरद पवार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group