सोलापूर :- बुधवार पेठ परिसरातील गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या पुढाकारातुन महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभाग यांचेकडील माझी वसुधंरा अभियान अंतर्गत जलसंपदा विभागाच्या पडीकजागेवर महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते उद्यान व दुभाजक सुशोभीकरणाच्या कामाला आजरोजी शुभारंभ करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, नगर अभियंता संदीप कारंजे, सहा.संचालक नगरचना लक्ष्मण चलवादी, मंड्या व उद्यान समितीचे सभापती गणेश पुजारी, नगरसेवक देवेंद्र कोठे, ज्यांती बमगोंडे, अविनाश बोमड्याल, जीएम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, महावीर सोसायटीचे अध्यक्ष इंद्रमन जैन, भगवती सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश वेद, बाबू तोष्णीवाल, उद्यान अधिक्षक निशीकांत कांबळे, ज्येष्ठ विधीज्ञ विजय मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
सदरच्या कार्यक्रमाच्यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम म्हणाल्या की, उद्यान विकसीत करण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करु असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ विधीज्ञ विजय मराठे म्हणाले की, गेल्या 40 वर्षापासूनची आमची मागणी दुर्लक्षित होती. या आमच्या मागणीला पूर्णपणे सहकार्य करणारे आमचे भागातील नगरसेवक आनंद चंदनशिवे यांचे आभार मानतो.
नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, माझी वसुधंरा अभियाना अंतर्गत जास्तीत जास्त वृक्षलागवड करुन सोलापूर शहरा मध्ये ऑक्सीजन निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत असं चंदनशिवे म्हणाले.
धनराज पांडे यांनी माझी वसुधंरा अभियान प्रभावीपणे राबविल्यास सोलापूरचे नांव महाराष्ट्रात लौकीक होईल असे धनराज पांडे म्हणाले.
सदरच्या कार्यक्रमाच्या वेळी महावीर सोसायटीचे चेअरमन :- इंद्रमल जैन, भगवती सोसायटीचे चेअरमन :- प्रकाश वेद, जयचंद वेद, ॲड.विजय मराठे, ॲड.उमेश मराठे, गौतम झंवर, हर्षल कोठारी, विनोद वैद्य, प्रकाश वैद्य, प्रकाश डाकलीया, भैरवलाल कोठारी, लालू खंडेलवाला, मनमोहन वैद्य, अभय खुराणा, प्रमोद ठोका, गोंविद सारडा, पवन काब्रा, गौतम संचेती, पुरुषोत्तम धुत, अनील चाछेड, सुनिल जैन, विकास शहा, चेतन बाफना, अलोक जैन, केतन बोरा, मुकेश जैन, प्रकाश मंत्री, दिनेश जैन, शृणिक कोचर, डॉ.असित चिडगूपकर, स्मिता चाकोते, C.A. जवळकर आदी उपस्थित होते.
