बी संघाची ४०५ धावांची हर्ष कामगिरी
हर्ष मोगवीराची धमाकेदार १७९ धावांची खेळी तर निमिर जोशीचे ७ बळी, दुसरा सामन्यात १५च षटकांचा खेळ.
हर्ष ओसवाल, हर्षल हाडके ची अर्धशतके
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुरुषांच्या वरिष्ठ गटाच्या डी.बी.देवधर चषक पाठोपाठ सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सौजन्याने येथील प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियम आणि दयानंद कॉलेज मैदानावर राज्यातील २३ वर्षाखालील मुलांसाठीच्या संघ निवडीसाठी ३ दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या दुसऱ्या फेरीतील पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून बी संघाच्या ३ हर्ष खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी करत ४०५ धावा झोडपल्या. त्यात हर्ष मोगावीरा चे दीडशतक तर हर्ष ओसवाल ७०, हर्षल हाडके ५५ धावा केल्या तर डी संघाकडून निमीर जोशीने ६१ धावांत ७ बळी मिळविले. दयानंद कॉलेजच्या मैदानावर कालच्या पावसामुळे उशिरा खेळ सुरू झाला व पुन्हा पाऊस आल्याने १५ च षटकांचा खेळ झाला
संक्षिप्त धावफलक :
[इंदिरा गांधी पार्क स्टेडियम]
एमसीए बी (१): ४०५/१० (७४.२)
हर्ष मोगावीरा १७९, हर्ष ओसवाल ७९, हर्षल हाडके ५५, सागर पवार ३४
निमिर जोशी ६१/७ बळी, शुभम खरात यश खळदकर प्रत्येकी १ बळी.
एमसीए डी(१): ४/० (१)
[दयानंद कॉलेज ग्राउंड]
एमसीए ए(१): ५२/२ (१५)
नीरज जोशी नाबाद २८, कौशल तांबे १०
वैभव टेहळे निलय संगवी प्रत्येकी १ बळी