सोलापूर – आषाढी वारीसाठी जाणाऱ्या सोलापूर येथील वारकरी भाविकांना वारीमध्ये पाऊस वगैरेचा त्रास होऊ नये म्हणून आस्था रोटी बँक सोलापूर यांचे वतीने श्री संत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठान, सोलापूर अध्यक्ष ह भ प शंकर भोसले यांचे माध्यमातून ह भ प लक्ष्मण चव्हाण महाराज व ह भ प सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष) यांचे शुभ हस्ते छत्रीचे वाटप करण्यात आले.





दरवर्षी वारकरी मोठया श्रद्धेने पायी वारी करतात आषाढी वारी ही पावसाळ्यात असल्यामुळे पाऊस असतो तरी वारकरी भाविकांची वारी सुरु असते त्यांना वारी मध्ये व्यवस्थित चालत जाता यावे म्हणून छत्रीचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी तानाजी बेलेराव महाराज, शिवाजी भोसले , भाऊसाहेब बेलेराव, अनिकेत भोसले, आस्था रोटी बँकेचे कार्यकर्ते स्नेहा वनकुद्रे, ज्योत्स्ना सोलापूरकर, संगीता छंचुरे, विनोद भोसले, विजय छंचुरे व आस्था रोटी बँकेचे टीम उपस्थित होती.







