सोलापूर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने राज्य सरकारला १० जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे . पदोन्नतिसह विविध मागण्या मान्य न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या संघटनेने दिल्याचे जिल्हा शाखेचे अध्यक्ष डॉक्टर डी. आर . राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पदोन्नती तसेच शैक्षणिक व आर्थिक हिताच्या मागण्यासंदर्भात कायम आडकाठी निर्माण करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.