उजनी पाणी प्रश्नावरून आता वातावरण अधिकच तापण्याची चिन्ह दिसत आहेत. या धरणाच्या पाणी वाटपावरून सोलापुरातील काही शेतकरी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमधील गोविंदबाग या निवास्थानासमोर आंदोलनाच्या तयारीत होते, मात्र त्या अगोदरच या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांच्या गोविंदबागतील निवासस्थासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीतील घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
उजनीच्या पाण्यावरून सोलापूर – पुणे जिल्ह्यात वाद
मागील काही दिवसांपासून सोलापुरातील काही संघटना या मुद्यावरून अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाल्याचे दिसून येत असून, त्यामुळेच सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याचे बोलेले जात आहे.
“…तर रक्तरंजित लढाईला तयार राहा,” शिवसेना आमदाराचा ठाकरे सरकारला इशारा
उजनी धरणातील पाण्यावरुन सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील वाद येत्या काही दिवसांत पेटण्याची चिन्हं आहेत. उजनी धरणातील पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी इंदापूरला देण्यावरून सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात सध्या वाद रंगला आहे. दरम्यान एकीकडे विरोधक यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधत असताना शिवसेना आमदाराने घरचा आहेर देत वादाच उडी घेतली आहे.
“…तर शरद पवारांनी उजणी धरणच पुणे जिल्ह्यात वळवलं असतं,” शिवसेना आमदाराच्या टीकेमुळे वाद पेटण्याची चिन्हं
उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकरी नेते माऊली हळणवर आणि दिपक भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांना जागृत करत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराच्या दारासमोर हालगी नाद आंदोलन केलं जात आहे. सांगोलाचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांच्या चीक महुद येथील निवासस्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने हलगी नाद आंदोलन केले. यावेळी त्यांनीदेखील विरोध दर्शवक अशा पद्धतीचा निर्णय झाला तर रक्तरंजित लढाईला तयार रहावे असा इशारा ठाकरे सरकारला दिला.