सोलापूर : ११७ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या उजनी धरणात सध्या ९६ टक्के म्हणजे ११५ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे आहे. सध्या दौंड मधून 4623 क्युसेक वेगाने उजनी धरणात पाणी मिसळत आहे. पुण्यात पाऊस नसल्यामुळे उजनी धरण संथ गतीने भरू लागले आहे. आहे त्या वेगाने पाणी आल्यास दररोज एक टीएमसी धरण भरते. सध्या दोन टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे उद्या सकाळपर्यंत उजनी धरण 116 टीएमसी भरेल आणि परवाच्या दिवशी म्हणजेच 5 ऑक्टोबर रोजी उजनी धरण 100 टक्के म्हणजे 117 टीएमसी क्षमतेने भरेल