येस न्युज मराठी नेटवर्क : केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी आज दिल्लीत बैठक होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक हेसुद्धा बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागात विकास करण्यासाठी केंद्रानं १२०० कोटींचा निधी राज्याला द्यावा देण्याची मागणी अमित शाहांकडे केली आहे. दुर्गम भागात नवीन पोलिस पोस्ट स्थापन करणार, मोबाईल टॅावर जास्तीत जास्त बसवण्यात येतील. नवीन शाळा स्थापन करण्यावर भर दिली जाईल. असही मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितलं.