सोलापूर : सरकार कोणतेही असो ते घोषणा करण्याचा स्वतःला धन्य मानतात. आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी विठुरायाच्या पंढरपूरला देखील असंच घोषणा रुपी फसवल आहे. आषाढी वारी च्या कालावधीमध्ये पंढरपूर नगरपालिकेला 5 कोटी रुपयाचं यात्रा अनुदान देण्याचा प्रतिकात्मक चेक देऊन सहा महिने उलटून गेले अद्याप नगरपालिकेला ह्यांचा मिळाले नाही. त्यामुळे उद्धवा अजब तुझे सरकार असेच म्हणण्याची वेळ पंढरी करांना आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालावधीमध्ये देखील केलेल्या घोषणा चे काही अनुदान अध्यक्ष आली नसल्याचे नगराध्यक्षा साधना भोसले यांनी माध्यमांना सांगितले. त्यामुळे ठाकरे सरकार आणि फडणवीस सरकार यांनी विठुरायाच्या पंढरीला देखील ठेंगा दाखवला आहे .केवळ घोषणा आणि फोटोसेशन करीत हे मंत्री स्वतःला पंढरीचे भक्त समजतात .आषाढी वारी संपून कार्तिकी वारी आज होत आहे तरीही सरकार याकडे लक्ष देत नाही हे दुर्दैव. त्यामुळे इतर तीर्थक्षेत्र कडे कोट्यावधी रुपयाचा अनुदान देणार्या सरकारने पंढरिला देखील भरघोस अनुदान . देण्यासाठी सावळा विठ्ठल मंत्र्यांना सद्बुद्धी देवो हीच सदिच्छा. पंढरपूर प्रमाणेच सोलापूरकरांनाही या सरकरने घोषणा रुपी फसवले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी आजवर तीन बैठक घेऊन तीन वेळा आश्वासन दिले. मात्र अदयाप ही ५० कोटींपैकी ५ रुपये देखील आले नाहीत.