सोलापूर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे चित्र उद्या स्पष्ट होईल. यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी सर्वच पक्षांमधून बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळते. उमेदवारांचा प्रचारार्थ राजकीय नेत्यांच्या तोफाही धडाडणार आहेत .
सोलापुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही नेते आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सोलापुरात एकाच दिवशी येणार असल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात अमर पाटील, सांगोला मतदारसंघात दीपक साळुंखे पाटील, बार्शी मतदारसंघात दिलीप सोपल यांना उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात महादेव कोगनुरे, उत्तर विधानसभा मतदारसंघात प्रशांत इंगळे, शहर मध्य, पंढरपूर या ठिकाणी आपले उमेदवार दिले आहेत. हे दोन्ही नेते सहा नोव्हेंबर रोजी सोलापुरात येणार असल्याचे माहिती समोर आली परंतु त्यांच्या सभेचे ठिकाण अद्यापही निश्चित नाही.