कुसळंब : सोलापूर- बार्शी राज्य मार्गावर जामगाव हद्दीतील राजे हॉटेल जवळ एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. हा अपघात दि. २ फेब्रुवाारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला.
दत्ता सोमनाथ गुजर (वय ३०) व सलीम जब्बार शेख (वय २९, दोघे रा. रामेश्वर भूम, जि. धाराशिव) असे अपघातात मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस सहाय्यक निरीक्षक जगदाळे, उपनिरीक्षक जनार्दन शिरसट, पोलीस हेडकॉन्स्टेबल रुपेश शेलार, राहुल बोंदर, बार्शी शहरचे कर्मचारी पोलीस अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले होते.