सोलापूर : शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यातील तक्रार अर्जात सहकार्य करू, पोलीस निरीक्षक आमच्या ओळखीचे आहेत असे म्हणून तक्रारदाराकडून दीड लाख रुपये लाजेची मागणी केलेल्या दोन खाजगी इसमांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
खाजगी इसम युवराज भिमराव राठोड वय ३७ वर्षे, रा. समर्थ नगर, जुळे सोलापूर व साजन रमेश हावळे वय ३६ वर्षे रा. ए विंग ७०५, मंगल रेसिडेन्सी जुळे सोलापूर असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
तक्रारदार यांचे विरुध्द सोलापूर शहर येथील पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या अर्जामध्ये सहकार्य करुन त्यांच्या विरुध्द दाखल अर्जावरुन गुन्हा दाखल न करण्याकरिता पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक हे आमच्या चांगल्या परिचयाचे आहेत असे सांगुन व तसे भासवुन तक्रारदार यांच्याकडुन १,५०,००० (दिड लाख रुपये) लाचेची मागणी केल्याचे पंचासमक्ष पडताळणी पंचनाम्यामध्ये निष्पन्न झाल्याने वर नमुद दोन्ही आरोपी खाजगी इसम यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कारवाई उमाकांत महाडीक, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर पोलीस अंमलदार- पोह शिरीषकुमार सोनवणे, मपोह अर्चना स्वामी, पोना अतुल घाडगे, पोना श्रीराम घुगे, पोकों स्वप्नील सन्नके, अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर यांनी केली.