सोलापूर – सोलापूर येथील रविनिशा रवींद्र चिंचोलकर हिला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात कुलगुरु प्रा.सुरेश गोसावी यांच्या हस्ते दोन सुवर्णपदके प्रदान करण्यात आली .
दिनांक 1 जुलै 2023 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२२ सभा पंतप्रधान समारंभ संपन्न झाला . या समारंभास राज्यपाल रमेश बैस,महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री प्रा .चंद्रकांत पाटील,भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ.राजेश गोखले, कुलगुरु प्रा . सुरेश गोसावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या समारंभात विविध विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदके प्रदान करण्यात आली .यात सोलापूर येथील रवीनिशा रवींद्र चिंचोलकर हिला एम . एस्सी. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सेस या अभ्यासकमात विद्यापीठातून सर्वप्रथम आल्याबद्दल कै.एस .एन . कारखानीस सुवर्णपदक तसेच डॉ.ललिता विजय खरे सुवर्णपदक ही दोन सुवर्णपदके प्रदान करण्यात आली .
रविनिशा चिंचोलकर हिला विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे ज्युनिअर रिसर्च फेलोशिप प्राप्त झालेली असून ती सध्या लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सेस या विषयांमध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून पी .एचडी. पदवीसाठी संशोधन कार्य करत आहे .