करमाळा : तालुक्यातील केम येथे गांजा विकणाऱ्या अरुण जनार्दन तळेकर आणि पिंपळकुटे येथील कचरे यांना सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडील ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी ही कारवाई २७ जून रोजी केली आहे. या कारवाईत आठ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे व त्यांच्या पथकाने लोखंडी कॉटवर बसून गांजा विकणाऱ्या इसमास पकडले. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वजन काटा, प्लास्टिकच्या गोणीमधील गांजा तसेच गांजा भरण्यासाठीच्या प्लास्टिक पिशव्या रोख रक्कम स्टेपलर आदी वस्तू जप्त केल्या आहेत. करमाळा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य आणि पदार्थ अधिनियम 1985 च्या कलम 8 क 20 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.