सोलापूर : हत्तुर शिवार येथील शेतातून पाच जुलै ते सहा जुलैच्या दरम्यान कंट्रोल बोर्ड बॉक्स, शक्ती पंप इंडिया लिमिटेड कंपनीचे रेग्युलेटर व कम्प्युटराइज्ड मशीन अज्ञात चोरट्याने चोरल्याची फिर्याद चंद्रकांत केशव पवार या शेतकऱ्याने केली आहे. या मशिनची किंमत वीस हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे हवालदार चव्हाण अधिक तपास करीत आहेत.