अक्कलकोट शहरातील विजय नगर येथे ७ आँगस्ट रोजी भरदुपारी पावणेएक ते अडीच वाचे सुमारास घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने अज्ञात हत्याराने व्यापा-याचे घराचे दरवाज्याचे कुलूप उचकटुन घरात प्रवेश करुन साडेबारा तोळे सोने अंदाजे साडेसात लाख रूपयांचे दागिने चोरून नेले. दिवसाढवळ्या भरदुपारी ही धाडसी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. फिर्याद श्रीशैल बसवणप्पा चनशेटटी (वय ५३ वर्षे) मेडीकल दुकान (रा. विजयनगर अक्कलकोट) यांनी दिली. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला असुन याबाबत पोलीस सुत्राकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादीची पत्नी शिक्षका असुन फिर्यादीची स्वतः ची मेडीकल दुकान आहे. ७ आँगस्ट रोजी सकाळी १० वाचे सुमारास फिर्यादी मेडीकल मध्ये व पत्नी शाळेमध्ये जायला घराबाहेर पडले व घरात मुलगा व मुलगी असे दोघेच होते. दुपारी पावणेएक वाचे सुमारास समर्थनगर येथील फिर्यादीची बहीण सरोजनी चंद्रकांत करोटी हिच्या कडे जात असताना घराचे दार व गेट बंद करून गेले. बहीणीच्या घरातील कार्यक्रम संपवुन साधारण दुपारी अडीच वाचे सुमारास फिर्यादी घराजवळुन मेडीकल कडे जात असताना घराचे गेट उघडे दिसले. त्यावेळी पत्नी शाळेतुन आली असावी असे वाटुन गेटमधुन आत गेले असाता घराचे दार अर्धवट उघडे असल्याने दरवाजा ढकलुन आत गेले असता बेडरूम मधील लोखंडी व लाकडी कपाटाचे दार उचकटुन आतील सर्व कपडे खाली अस्ताव्यस्त पडले दिसले. फिर्यादीने पत्नी, मुलाला, मुलीला फोन व्दारे सांगुन घरी बोलावून घेतले. कपाटात असलेले सोन्याचे दागीने पाहीले असता दागीने आढळुन आले नाही. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात हत्याराने दरवाज्याचे कुलूप उचकटुन घरात प्रवेश करुन सोन्याचे दागीन्याची चोरी केली. यामध्ये सोन्याचे ५ तोळे वजनाचे पाटल्या अंदाजे किंमत तीन लाख रूपये, सोन्याचे ४ तोळे वजनाचे बिलवर अंदाजे किंमत २ लाख चाळीस हजार रूपये, सोन्याचे ३.५ तोळे वजनाचे गंठन अंदाजे किंमत दोन लाख दहा हजार असे एकुण साडे सात लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरून नेले.अधिक तपास पोलीस करत आहेत.