मोडनिंब – स्वातंत्र्यदिनानिमित्त सोलापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने ‘तिरंगा चषक’ भव्य जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन तनिष्का चेस अकॅडमी, मोडनिंब यांच्यातर्फे करण्यात आले आहे. ही स्पर्धा २४ ऑगस्ट २०२५ रविवारी सकाळी ९ वाजता शिवपार्वती मंगल कार्यालय, बस स्टॅन्ड जवळ, मोडनिंब येथे भरणार आहे. अंकुर फाउंडेशन, मोडनिंब हे स्पर्धेचे प्रायोजक आहेत.
स्पर्धा तीन वयोगटांतर्गत होणार आहे. १४ वर्षांखालील, १७ वर्षांखालील व खुला वयोगट असे वयोगट असून प्रत्येक वयोगटातील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे व पदक देण्यात येणार आहेत.याशिवाय, माढा तालुक्यातील सर्व वयोगटातील खेळाडूंसाठी स्वतंत्र विशेष बक्षिस योजना जाहीर करण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क १५० रुपये असून २१ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणी करण्यास सांगितले आहे. त्यानंतर ५० रुपये लेट फी सह नोंदणी २१ ऑगस्ट रात्री ११ वाजेपर्यंत करता येईल. नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन आहे. प्रथम PhonePe द्वारे ९७६३७ २०१२२ या क्रमांकावर शुल्क भरून नंतर दिलेल्या लिंकवरुन फॉर्म भरावे.स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळवली जाणार आहे. सहभागी खेळाडूंनी खासगी चेसबोर्ड, ओळखपत्र, जेवणाचा डबा व पाण्याची बाटली आपल्याकडे आणणे अनिवार्य आहे.
अधिक माहितीसाठी ९७६३७ २०१२२ व ७९७२३ ८०५३३ या क्रमांकावर संपर्क करता येईल.
“बुद्धिबळ ही व्यक्तिमत्त्व विकास घडवण्याची स्पर्धा आहे, या स्पर्धेत सहभागी व्हा” असे आवाहन तनिष्का चेस अकॅडमी तर्फे श्री परमेश्वर सुरवसे यांनी केले आहे.