“भारतरत्न डॉ बी आर आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवसा निमित्त श्रद्धांजली कार्यक्रम” आज ६ डिसेंबर २०२३ रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवसाचे आयोजन मंडल रेल प्रबंधक कार्यालय, सोलापूर येथे करण्यात आले.
या कार्यक्रमात विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री निरज कुमार दोहरे, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, श्री शैलेंद्र सिंह परिहार, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (गती शक्ती युनिट) श्री अवनिश वर्मा व शाखा अधिकाऱ्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. सामुदायिक बुद्ध वंदना पश्चात दोन मिनिटांचा मौन पाळून सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली. ओबीसी असोसिएशनचे प्रतिनिधी औदुम्बर सुतार,एन आर एम यु युनियनचे प्रतिनिधी श्री माणिक राव यमगर, सी आर एम एस युनियनचे प्रतिनिधी श्रीमती ऋतुजा सोनवणे, एससी-एसटी असोसिएशनचे प्रतिनिधी कुमारी रविना उके यांनी डॉ बाबासाहेबांच्या राष्ट्रव्यापी योगदानाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. श्री निरज कुमार दोहरे यांनी डॉ बाबासाहेबांच्या विचाराचे कार्याचे उद्दिष्ट व समाज हितासाठी केलेले कठोर परिश्रमाची उल्लेख केला.
या कार्यक्रमात वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी श्री जी पी भगत, मुख्य चिकित्सा अधीक्षक डॉ , रामा क्रिष्णा माने , वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक श्री रनयेवले , वरिष्ठ परिचालन प्रबंधक श्री प्रदीप हिरडे व शाखेचे अधिकारी, मान्यता प्राप्त युनियन व असोसिएशनचे पदाधिकारी आणि सर्व शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. हिंदी विभागाचे वरिष्ठ अनुवाद श्री मुश्ताक शेख यांनी बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा देत कार्यक्रमाचे संपुर्ण सूत्रसंचालन करीत उपस्थीतानचे आभार केले.