सोलापूर -शिवसेनेच्या वतीने सिद्धेश्वर तलाव परिसरात पवित्र अशी बेलाचे झाडे लावण्याचा उपक्रम शिवसेना शहरप्रमुख महेश धाराशिवकर उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर बहुजन समाज पक्षाचे देवा उघडे जनता बँकेचे संचालक अमोल कळके सोनार समाजाचे सुधाकर शहाणे सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे यशोवर्धन वेणेगुरकर मनसे विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख अभिषेक रमपुरे विनोद पाटील नाना कळसकर दीपक गायकवाड यल्लाप्पा पुजारी आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला याप्रसंगी बेलाची 11 झाडे ट्री गार्डसह लावण्यात आली ट्री गार्ड साठी सुनील रिक्के यांनी जाळी मोफत दिली याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले…