सोलापूर – कचरा मुक्तीचे जिल्ह्यात दूरगामी परिणाम होतील. कचरा मुक्त ग्राम साठी लोकांचे मन परिवर्तन करा. असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कचरा मुक्त ग्राम चा शुभारंभ जिल्हा परिषदेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आला. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, दक्षिण चे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, उत्तर चे गटविकास अधिकारी गणेश पाटील, पशुसंवर्धन अधिकारी पी व्ही देशमुख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी अभियानाचा लोग असलेले व माहिती पोस्टर चे प्रकाशन करणेत आले.
सिईओ स्वामी म्हणाले , लोकामध्ये कचरा बद्दल अज्ञान आहे. हे माझे काम आहे का ? असे मनांत ठेऊ नका. आधी मनातील कचरा दूर करा. असे सांगून सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रत्येक गाव हे तिर्थक्षेत्र असल्याचे सांगितले आहे.
कचरा मुक्त गाव अभियान हे संकल्पना आहे. लोकांचे मनपरिवर्तन करा. मनातील जळमटे काढून टाका. आपणास कोण विचारणार हे मनांत ठेऊ नका? वेळेचे महत्व लक्षात घ्या. ग्रामसेवक सक्षमपण काम करणार नाहीत तो पर्यंत गावाचा विकास होणार नाही. ज्या सेवेमुळे माझे कुटूंब चालते. त्याचा विसर पडू देऊ नका. रोज ग्रामपंचायतीच्या दररोज २५ तक्रारी येतात. आपण आत्मपरिक्षण करा. चांगले नियोजन करा. गावात जा. लोकांशी बोला. दाखले व उतारे देणे हे ग्रामसेवकांचे एवढेच काम नाही. सामाजिक उपक्रमांत सहभागी व्हा. वैविध्यपुर्ण व नाविन्यपुर्ण उपक्रम राबवा.
सर्व विभाग हे आपल्या गावाशी निगडीत आहेत.
अंगणवाडीत जाऊन शिक्षक शिकविणार
सर्व अंगणवाडी केंद्रात प्राथमिक शिक्षक एक तास शिकविणार आहेत. त्या साठी आदेश काढणार आहोत. अंगणवाडीतील मुले प्राथमिक शाळेत येतील. त्यांचा पायी पक्का होईल.
कचरा मुक्त अभियान यशस्वी करा
आपणास कचरा उचलायचा नाही. कचरा चे नियोजन करा. सर्वांचा सहभाग घ्या. महिला बचतगटाचा सहभाग घ्या. १ लाख २८ हजार महिल आहेत.
सिईओ दिलीप स्वामी पुढे म्हणाले, लोकांना विचार करायला लावणे ही तुमची गुरूकिल्ली आहे. गावातील स्वच्छता हाच गावाचा आरसा आहे.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी तपासणी पथक नेमणूक करणेत येणार आहे. जिल्हयाचे विभाग प्रमुख पालक अधिकारी म्हणून नेमणूक येणार आहेत. कुचराई आढळलेस कारवाई प्रस्तावित करणेचे अधिकार असतील असेही सिईओ स्वामी यांनी स्पष्ट पणे सांगितले.जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी संदीप कोहिणकर म्हणाले, कचरा वर्गीकरण केले पाहिेजे. केवळ संकलन करून उपयोग नाही. वर्गीकरण करणे साठी नियोजन करा. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करा. असेही कोहिणकर यांनी सांगितले.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी. इशाधिन शेळकंदे यांनी प्रास्तविक केले. अभियान यशस्वी करा. या अभियानाचे माध्यमतून लोकांत जा असे सांगून प्रत्येक कामासाठी कारवाई करणेची वेळ आणू नका. सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. स्वागत क्षमता बांधणी तज्ञ शंकर बंडगर, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, मुल्यमापन सल्लागार यशवंती धत्तुरे, पाणी गुणवत्ता सल्लागार दिपाली व्हटे, यांनी केले. प्रारंभ घनकचरा सल्लागार मुकुंद आकुडे व सांडपाणी सल्लागार प्रशांत दबडे यांनी मार्गदर्शन केले. वित्त व संपादणूक सल्लागार अर्चना कणकी, सीआरसी आम्रपाली गजघाटे, अल्फिया बिराजदार , राहुल बाबरे , अनंत सितापराव, यांनी परिश्रम घेतले. आभार ग्रामसेवक मदन कांबळे यांनी मानले.