सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील सात पोलीस निरीक्षकांच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गुरुवारी सायंकाळी बदल्या केल्या आहेत. या आदेशानुसार सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखा या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना सांगोला पोलीस ठाण्याचे निरीक्षक या पदावर बदली करण्यात आली आहे. वाचक शाखेतील रणजीत माने यांना मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक या पदावर पाठवण्यात आले आहे सर नियंत्रण कक्षातील नामदेव शिंदे यांना वाचक शाखेत पाठवण्यात आले आहे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांना जिल्हा विशेष शाखेतून अक्कलकोट पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहेत नियंत्रण पक्षातील कृष्णदेव पाटील यांना सुरक्षा शाखेत नियुक्ती केली आहे नियंत्रण कक्षातील ज्योतीराम गुजवटे यांना विशेष शाखेत नियुक्ती देण्यात आली आहे