सोलापूर : शहरातील दोन वर्षांच्या दोन मुलींचा खेळत असताना पालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भवानी पेठेतील दाळगे प्लॉट येथे राहणाऱ्या स्वरा करबसय्या स्वामी ही मुलगी खेळत – खेळत घरातील गरम पाणी ठेवलेल्या भांड्याजवळ गेली आणि ती त्या गरम पाण्यात जाऊन बसल्यामुळे जोरजोरात रडू लागली. घरातील लोकांनी नंतर पळत येऊन तिला बाहेर काढले . परंतु तिचा पोटापासूनचा खालचा भाग भाजला होता. तिला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली आहे.
दुसरी घटना साईबाबा चौकात घडली आहे. कारण्या रमेश अनंतुले ही दोन वर्षाची मुलगी चौरंग पाटा डोक्यात पडल्यामुळे मृत्युमुखी पडली आहे. तिला मंगळवारी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कपाटावर ठेवलेला चौरंग पाट डोक्यात पडल्यामुळे हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. लहान मुले घरात नेहमीच खेळत असतात परंतु पालकांचे अशा मुलांकडे व्यवस्थित लक्ष नसते हे, या दोन्ही घटनांमुळे स्पष्ट होत आहे. आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे दोन्ही घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुली असल्यामुळे पोलिसांनी वेगळ्या दृष्टिकोनातून देखील या घटनांचा तपास करणे आवश्यक आहे.