पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण
सोलापुर : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे कृषी यांत्रिकीकरण उप अभियान आणि उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत शुक्रवारी उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील २० शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारांचे अनुदानावर वाटप करण्यात आले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या ट्रॅक्टरचे प्रातिनिधिक स्वरूपात लोकार्पण करण्यात आले. ट्रॅक्टर साठी एक लाख आणि पॉवर ट्रीलरसाठी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात आल्याचे उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्याच्या कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी सांगितले. शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते . राज्य सरकारच्या कृषी विभागाने काढलेल्या लॉटरीमध्ये या शेतकऱ्यांची निवड झाल्याचे मिसाळ यांनी सांगितले. यावेळी १३ ट्रॅक्टर आणि २ पॉवर ट्रीलर देण्यात आले.