येस न्युज मराठी नेटवर्क : टाळेबंदी मध्ये कंटाळलेले पर्यटक पुन्हा आपल्या मनपसंदीदार जागेवर आकर्षित झाले असताना, मलाही पर्यटनाची उत्सुकता लागून राहिली होतीच. कोरोनाची काळजी घेत मी पुन्हा पर्यटन करायचे मनात निश्चित केले. रिमझिम पाऊस, जंगल, चहा आणि निसर्ग याचा संगम असणारे मोगलीचे रान म्हणजेच पेंच पर्यटन स्थळ मला नेहमीच खुणावत होते. शहरीकरणा पासून थोडी विश्रांती घेण्याची गरज म्हणून मीही पर्यटनाला निघालो. तात्काळ मध्यप्रदेशला जायचे ठरवले. पेंचचा काही भाग हा महाराष्ट्रात आहे व बाकी भाग मध्य प्रदेशात आहे.म्हनून मी मध्यप्रदेशला जायचे ठरवले.
कोरोनामुळे निर्बंध होते. परंतु निर्बंध शितील होताच मला पेंच जंगलाने स्वतःकडे आकर्षित केले.मी एका खाजगी पर्यटक व्यवस्थापकाकडून रेल्वेचे बुकिंग केले. यावेळी माझा प्रवास रेल्वेने होणार होता असे स्पष्ट होत होते. विमान प्रवास थोडा धोकादायक वाटत होता खरा ,पण यावेळी मी रेल्वेचा अनुभव घ्यायचा म्हणून तिकीट बुकिंग केले होते. हा प्रवास सोलो म्हणजे एकट्याने करण्याचे ठरवले होते. कुरणाच्या धरतीवरती गर्दी वाढू नये म्हणून मी कुटुंब संगती घेतले नव्हते.ऑनलाइन वन्य प्रवेश पास काढण्यासाठी मी संकेत स्थळावर जाऊन दोन सकाळच्या सफारी बुक केल्या . योग्य ते दर व माहिती देत दोन व्याघ्र सफारी बुक केल्या . कोरोनाचा काळ असल्याने मला सहज पास म्हणजे परमिट मिळाले.
मी रेल्वेने प्रवास करत मध्य प्रदेशात पोहोचलो. तेथे राहण्याची, जेवणाची व्यवस्था व तिथे फिरण्याची सोय तात्काळ करण्याचे मनात ठरवून मी निघालो होतो.
सोलापूरहुन रेल्वेने पुणे गाठले. एक दिवस विश्रांती घेऊन सायंकाळी नागपूरची स्पेशल ट्रेन घेतली .हलक्या पावसाच्या सरी, रेल्वेचा प्रवास व खिडकीतून दिसणारे निसर्गरम्य देखावे मनाला आल्हाददायक वाटत होते .सकाळी मी नागपूरला पोहोचलो. नागपूरचा कडक वाफाळता चहा घेऊन मी मध्यप्रदेश कडे निघण्याचा प्रवास एक खाजगी गाडीने बुक केला व पेंच व्याघ्र प्रकल्पाकडे निघालो. रस्त्यात हलका पाऊस होता. माझी पेंचला जाण्याची ही दुसरी वेळ होती. रस्ता ओळखीचं वाटत असला तरी पुनश्च नाविण्यपूर्ण प्रवास वाटत होता. टप टप पडणाऱ्या पावसाच्या थेंबांची गर्दी वाढत होती .आम्ही चहाला थांबलो. गरम चहा आणि कांदा भजीचा अनोखा मेळ अनुभवला . पुढे वनविभागाच्या चौकीवर माहिती देऊन पुढे सरकलो. मी एक सुंदर वन रिसॉर्टला पोहोचलो .तेथे तंबू भाड्याने मिळतात त्यापैकी मी एकर रॉयल तंबू स्वतःसाठी बुक केला.
संध्याकाळी गरमा गरम जेवणाचा आस्वाद घेतला. थंड हवा असल्याने आणि पोटभर जेवण झाल्याने मी दुसऱ्या दिवशीच्या सकाळीची तयारी करत झोपी गेलो .सकाळी व्याघ्र सफारीची तयारी केली. साहित्याची बॅग खांद्यावर घेत मी पहाटेच्या काळोख्या अंधारात रूम मधून निघालो.तर जीप गाडी भल्या पहाटे येऊन थांबली होती. माझ्या सफारीची सुरुवात झाली. मी तुरिया गेटला पोहोचलो. कागदपत्रे दाखवत आमची गाडी पुढे सरकली.
प्रवेश करताच सुंदर जंगल
पावसाने न्हाऊन निघालेली हिरवीगार झाडे आणि वन्य प्राणी गाडीच्या लायटीच्या उजेडात अधून मधून दिसत होते. डोळे दिपवणारी ही दृश्य पाहून खूप आनंद झाला ,पण वाट पाहत होतो ती वाघ दिसण्याची.तो योग जवळ येत होता. जंगलातले विविध आवाज ऐकू येत असताना गाईडला एक बिबट्या झाडावर बसलेला दिसला. तोऱ्यात बसलेला बिबट्या पाहून खूप आनंद झाला. त्याचे चित्रीकरण आणि छायाचित्र काढून घेण्याची संधी मी गमवणार नव्हतो. पुढे चालत असताना जीप गाडी एक पाण्याच्या डबक्यपाशी येऊन थांबली. हा तोच क्षण होता जेव्हा मला वाघाचे दर्शन झाले .मी आधीही वाघ पाहिला होता परंतु हा क्षण एक वेगळाच आनंद देणारा होता. तो वाघ आयटीत बसल्यामुळे रुबाबदार दिसत होता. या प्राण्याकडून शिकण्यासारख खूप आहे. त्याची ऐट, रुबाब त्याच्या नावाला शोभेल असाच होता. काही काळ डोळे भरून पाहिल्यानंतर आमची जीप गाडी तिथून निघाली . एकाच सफारीत बिबट्या व वाघ बघण्याचा दुर्मिळ क्षण मी अनुभवला .दुसऱ्या दिवशीच्या सफारीत मात्र इतर प्राणी पाहण्याचा आनंद व अनुभव घेतला. इतर प्राणी पाहणे, झाडे ,पक्षी ,वन्य प्राणी अभ्यास करण्यासाठी अनेक लोक येथे येतात छायाचित्रकारांसाठी तर ही एक पर्वणीच आहे .
दुसऱ्या दिवशीच्या जिप सफारीत हलका पाऊस अनुभवला. रिसॉर्ट मध्ये परत आलो आणि काही काळ विरंगुळा घेऊन परतीचे प्रवासाला निघालो. पुन्हा नागपूरला येऊन रेल्वे प्रवासाने पुणे गाठले. पुण्याहून सोलापूरला येताच सर्व अनुभव नातेवाईक व मित्र मंडळींना सांगितले. त्यांच्या चेहऱ्यावरही पेंच व्याघ्र प्रकल्पाला जाण्याचा उत्साह दिसून येत होता .
शहरीकरणा मधल्या दररोजच्या दगदगीच्या जीवनात विरंगुळा म्हणून वन्यजीव सृष्टी पाहण्यासाठी प्रत्येकाने थोडासा स्वतःसाठी वेळ काढून वन्यजीवन अनुभवले पाहिजे.
खरंच वन्य प्राण्यांचे जीवन खूपच सुंदर आहे म्हणून मला म्हणावेसे वाटते,